पोलिसांनीच लुटले २४ लाखांचे हिरे, ४ आरोपी अटकेत

0
55

मुंबई, ५ ऑगस्ट
एका हिरे व्यापार्‍याने दोन पोलिस कॉन्स्टेबलवर २४ लाख रुपयांचे हिरे लुटल्याचे आरोप केला आहे. ही घटना एका सीसीटीव्ही फूटेजच्या माध्यमातून उघडकीस आली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी दोन पोलिसांसह ४ जणांना अटक केली आहे. मात्र, मास्टरमाइंड अद्याप फरार आहे. कॉन्स्टेबल्सने एका कथित हिर्‍याच्या एजंटला हाताशी धरून ही लूटमार केली आहे.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २ ऑगस्टची असून बोरीवलीत घडली. राज नामक हीरा एजंट एका महिलेसोबत बोरीवली येथील हीरा व्यापारी जयेश झवेरी यांच्याकडे हिरे विकण्यासाठी घेऊन आला होता. सायंकाळी ४.३० वाजता दोन पोलिस जयेश यांच्या दुकानात आले. अवैध व्यापार केल्याचा आरोप करून राज आणि जयेश या दोघांना आपल्या गाडीत बसवून घेऊन गेला. छापा टाकल्याचे नाटक करून त्याने राजला दोन झापडीही मारल्या. त्यानंतर त्याने हिरे जप्त केले. राज आणि जयेशला गाडीत बसवून पोलिस मुख्यालयी घेऊन जाऊ लागले. मात्र, पोलिसांनी गाडी रस्त्यावर थांबवून दोघांना खाली उतरवले आणि हिरे स्वत:कडेच ठेवून घेतले. दोन्ही कॉन्स्टेबलनी राज आणि जयेशला एक फोन नंबर देऊन रात्री फोन करण्यास सांगितले. नंतर तर हीरा एजंट राज फरार झाला. जयेशला दोन्ही पोलिसांवर संशय आला. त्याने बोरीवली पोलिस स्टेशन गाठले आणि झालेला सगळा प्रकार सांगितला.
सीसीटीव्हीमध्ये घटना कैद
पोलिसांनी केलेल्या लूटमारीची घटना जयेश यांच्या ऑफिसमध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे. पोलिस कॉन्स्टेबल ऑफिसमध्ये घुसताच राजच्या कानात मारताना दिसतो. कॉन्स्टेबल्स व्यापारीला धमकावतात आणि आपल्यासोबत चलण्यास सांगतात.
व्हिडीओ फूटेजच्या मदतीने दोन्ही आरोपी पोलिसांची ओळख पटली आहे. दोघांना ३ ऑगस्टला अटक केली आहे. कथित हीरा एजंट राज आणि त्याच्यासोबत आलेल्या महिलेचा देखील यात सहभाग असल्याचे चौकशीत समोर आले. पोलिस कॉन्स्टेबल चंद्रकांत गवरे आणि संतोष गवस दोन्ही मुंबई पोलिसांच्या एलए ब्रँचमध्ये कार्यरत आहेत. आतापर्यंत पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. मात्र, या प्रकरणातील मास्टरमाइंड राज अद्याप फरार आहे.