सुमित राघवन्‌ने दाखवली नाट्यगृहाची दुरवस्था

0
110

औरंगाबाद : गेल्या वर्षी डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या दुरवस्थेचे दर्शन घडवणार्‍या अभिनेता सुमित राघवन्‌ने औरंगाबादमधील संत एकनाथ रंगमंदिरातून ‘फेसबूक लाइव्ह’ करत प्रशासनाच्या कारभाराची पोलखोल केली आहे. ‘एक शून्य तीन’ या नाटकाच्या प्रयोगासाठी सुमित, स्वानंदी टिकेकरसह संपूर्ण टीम संत एकनाथ रंगमंदिरात पोहोचली, मात्र तिथले भीषण दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. रंगमंचावरील मोडक्या लाकडी फळ्या, फ्लोरिंगला पडलेल्या भेगा, मेक-अप रूममधील अस्वच्छता आणि जागोजागी दुर्गंधी. अखेर न राहावलेल्या सुमितने ‘फेसबूक लाइव्ह’च्या माध्यमातून हे विदारक दृश्य चाहत्यांसोबत शेअर केले आणि प्रशासनाचेही लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.