आजच्या दिवशी शाहरुखला ‘या’ फोनची प्रतीक्षा!

0
125

मुंबई : भावा-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या राखीचा दिवस आज आहे. सर्वसामान्य लोकांप्रमाणे शाहरुख खान सुद्धा हा सण साजरा करतो. या दिवशी शाहरुखला एका स्पेशल फोनची प्रतीक्षा असते. दरवर्षी राखीच्या दिवशी शाहरुख खानला न चुकता राखीच्या शुभेच्छा देणारा फोन येतो आणि शाहरुख हा फोन घेतल्यानंतर आनंदाने सैरभैर होतो. कारण हा फोन असतो पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा. अलीकडे शाहरुख खान कोलकात्यात ‘जब हॅरी मेट सेजल’च्या प्रमोशनसाठी पोहोचला होता. यावेळी त्याने ममता दी व त्याच्या या आगळ्या-वेगळ्या नात्याविषयी खुलासा केला. दरवर्षी दीदी मला राखीच्या दिवशी फोन करून शुभेच्छा देतात, असे शाहरुखने यावेळी सांगितले. त्यामुळे आज ममता दी शाहरुखला फोन करतात वा नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.