बिग-बॉसमध्ये ओवियाचा आत्महत्येचा प्रयत्न!

0
138

चेन्नई : सध्या बिग बॉस-तामिळ चांगलाच चर्चेत आहे. टीआरपी आणि ट्रेंडच्या शर्यतीत या रिऍलिटी शोने अव्वल क्रमांक मिळवला आहे. सध्या या शोची स्पर्धक ओविया हेलनदेखील चर्चेत आहे. कधी बिग बॉसच्या घरातील भांडणांमुळे, कधी इन्स्टाग्रामवरील फोटोंमुळे ओविया चर्चेत होती. पण आता ओवियाने असे काही केले की, सगळीकडेच खळबळ माजली. मिळालेल्या बातमीनुसार, ओवियाने बिग बॉसच्या घरात आत्महत्येचा प्रयत्न केला. शुक्रवारी ओवियाने बिग बॉसच्या घरातील स्विमिंग पूलमध्ये उडी घेतली आणि स्वत:ला बुडवण्याचा प्रयत्न करू लागली. मागच्या सहा आठवडे बिग बॉसच्या घरात राहणारी ओविया तिचा को-कंटेस्टंट आरववर भाळली होती. मात्र आरवने तिचा प्रेमप्रस्ताव नाकारला. यामुळेच नाराज ओवियाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे कळते.