अभिषेकचा श्‍वेतासोबतचा लहानपणीचा फोटो

0
106

मुंबई : अभिनेता अभिषेक बच्चन आणि त्याची बहीण श्‍वेता नंदा यांच्यात फारच चांगले सामंजस्य आहे आणि ते रक्षाबंधनाच्या निमित्ताने समोर आले आहे. अभिषेकने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर एक फोटो पोस्ट केला आहे. यात आपल्याला लहान अभिषेक आणि श्‍वेता पाहायला मिळत आहे आणि विशेष म्हणजे या फोटोत अभिषेकच्या डोक्यावर एकही केस नाही. त्यामुळे अभिषेकच्या चाहत्यांना हा फोटो प्रचंड आवडत आहे. या फोटोला हजारापेक्षा जास्त पसंती मिळाली असून अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत.अभिषेकने हा फोटो पोस्ट करताना त्यासोबत एक छान पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमधून त्याने त्याची मोठी बहीण श्‍वेतावर असलेले आापले प्रेम व्यक्त केले. त्याने पोस्टमध्ये म्हटले की, मी आजही वयाने तितकाच लहान आहे, असे तिला नक्कीच वाटत असणार… पण मला खात्री आहे की, तिला जेव्हाही गरज असेल तेव्हा मी तिच्यासोबत असणार आणि ती माझ्यासोबत असणार… श्‍वेता ‘हॅपी राखी’…अभिषेकने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये श्‍वेता आणि अभिषेक खूपच गोड दिसत आहेत. नेटकरी त्यांच्या कपड्यांचेही कौतुक करीत आहेत.