म्हणून शाहरुखची बहीण माध्यमांपुढे येत नाही

0
132

मुंबई : अभिनेता शाहरुख खान यशाच्या सर्वोच्च शिखरावर आहे. शाहरुख आणि त्याच्या कुटुंबावर नेहमीच अनेकांच्या नजरा असतात. त्याची पत्नी, मुलगी आणि मुलगा एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे आयुष्य जगतात. पण, त्याच्या कुटुंबात एक अशी व्यक्ती आहे जी आजही या झगमगाटाच्या दुनियेपासून बरीच दूर आहे आणि ती व्यक्ती म्हणजे शाहरुखची बहीण शहनाज लालारुख.
ती शाहरुखसोबतच राहते. पण, प्रसारमाध्यमांमध्ये तिचा वावर फार कमी आहे. सूत्रांच्या मते, वडिलांच्या मृत्यूनंतर शहनाजला मानसिक धक्का बसला होता. बरेच दिवस उपचार केल्यानंतर ती सावरली. आपल्या याच बहिणीविषयी एका मुलाखतीत शाहरुख म्हणाला होता की, ती खूपच शांत असते. पण, ती जशी आहे तशी मला आवडते. वडिलांचा मृतदेह शाहरुखने घरी आणला तेव्हा शहनाज शाळेत गेली होती. तिला याविषयी काहीच सांगण्यात आले नव्हते. जेव्हा हा सर्व प्रकार कळला तेव्हा तिला जबर धक्का बसला. त्यानंतर शहनाज आजारीच राहात होती आणि कुटुंबाची सर्व जबाबदारी शाहरुखने सांभाळली. शहनाजचे आजारपण इतके वाढले होते की तिच्या जगण्याची शाश्‍वती नव्हती. उपचारासाठी शाहरुखने तिला स्वित्झर्लंडला नेले. उपचारांमुळे तिची प्रकृती सुधारली. शाहरुखला ती नेहमीच साथ देते. मोठी बहीण असल्यामुळे ती शाहरुखला आईसारखी आहे.