लग्नाचा विचार सध्याच नाही : प्रभास

0
142

मुंबई : अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री अनुष्का शेट्टी ही जोडी बाहुबली या चित्रपटामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. या चित्रपटाच्या दुसर्‍या भागात त्यांची केमेस्ट्री चित्रपटाच्या लोकप्रियतेमागील मोठे कारण होते. चित्रपटाच्या प्रमोशन काळात अनुष्का व प्रभासमध्ये जवळीक वाढली आणि ते रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा सुरू झाली.
विविध कार्यक्रमांना एकत्र आल्यावर कॅमेर्‍यांच्या नजराही या जोडीवर खिळल्या असायच्या. पण, या दोघांनी कधीही याबाबत काहीच प्रतिक्रिया दिली नाही. प्रत्येक कार्यक्रमात खाजगी आयुष्य, लग्न आणि अनुष्काविषयी प्रभासला विचारले जाऊ लागले. नुकत्याच एका मुलाखतीत प्रभासने काही गोष्टी स्पष्ट केल्या. प्रभास म्हणाला की, सध्यातरी माझ्या फिमेल चाहत्यांना चिंता करण्याची गरज नाही. कारण सध्या माझा लग्नाचा मुळीच विचार नाही.