श्रीसंतला दिलासा;श्रीसंतला दिलासा;

0
89

केरळ हायकोर्टाने उठविली बंदी
बीसीसीआय देणार निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान
कोची, ७ ऑगस्ट 
स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आजीवन क्रिकेटबंदीची शिक्षा भोगत असलेल्या क्रिकेटपटू एस. श्रीसंतला दिलासा मिळाला आहे. सोमवारी केरळ उच्च न्यायालयाने बीसीसीआयद्वारे लावण्यात आलेला प्रतिबंध उठविला आहे. २०१६ साली आयपीएल-६मध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळल्याने श्रीसंतवर ही बंदी घालण्यात आली. तिकडे, हायकोर्टाच्या या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात येणार असल्याचे बीसीसीआयच्या सूत्राने म्हटले आहे. बीसीसीआय सध्या अंतिम आदेशाची प्रतिलिपी मिळण्याची प्रतीक्षा करीत आहे. या वर्षी केरळच्या एर्नाकुलम क्लबच्या दोन दिवसीय प्रथम श्रेणी सामन्याद्वारे श्रीसंतचे पुनरागमन होणार वृत्त होते, परंतु यापूर्वी श्रीसंतला स्कॉटलंडमध्ये क्लब क्रिकेट खेळावयाचे होते, परंतु बीसीसीआयने त्याला याकरिता ना-हरकत प्रमाणपत्र दिले नाही.
या निर्णयानंतर श्रीसंतने ट्विट करून ईश्‍वर महान आहे असे म्हणत आभार मानले आहे. जेव्हा मला आजीवन प्रतिबंधाबाबत कोणतेही अधिकृत पत्र मिळालेच नाही, तर पंच मला खेळण्यापासून कसे रोखू शकतील. जेव्हा मी तिहार तुरूंगात होतो, तेव्हा मला केवळ एक निलंबनाचे पत्र मिळाले होते. निलंबन पत्र केवळ ९० दिवसांसाठी वैध होते, परंतु आजपर्यंत क्रिकेटबंदीसंदर्भात मला कोणतेही अधिकृत पत्र मिळाले नाही. मी मूर्ख होतो, जो इतक्या दिवसांपर्यंत क्रिकेट खेळलो नाही. माझ्यासोबत दहशतवादीपेक्षा अधिक खराब व्यवहार केला गेला, असे श्रीसंतचे म्हणाला.
२०१३ मध्ये आयपीएल अंतिम टप्प्यात असतानाच स्पॉट फिक्सिंगच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. १६ मे २०१३ रोजी श्रीसंत व राजस्थान रॉयल्सचे त्याचे दोन अन्य सहकारी अजित चंडिला व अंकित चव्हाण यांना अटक करण्यात आली होती. आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग केल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी या तिघांना मुंबईत अटक केली होती. (वृत्तसंस्था)