कपिल शर्माचा शो आणखी एक वर्ष

0
127

मुंबई : सुनील ग्रोव्हरसोबतच्या वादानंतर कपिल शर्माच्या कार्यक्रमाचा टीआरपी घसरला होता. त्यामुळे कपिल शर्माचा शो बंद होण्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, आणखी एक वर्षासाठी सोनी चॅनलने कपिल शर्मासोबत करार वाढवला आहे. सोनी चॅनलकडून कपिलसोबतच्या करारासंदर्भात पत्रक जारी करण्यात आले आहे. यामध्ये म्हटले आहे की, कपिल शर्मा उत्कृष्ट कॉमेडियन आहेत, त्यांच्या शोमुळे कोट्यवधी प्रेक्षक खळखळून हसतात. त्यामुळे कपिलसोबतचा करार वाढवण्याचा विचार चॅनलने केला आहे. सोनी कंपनी करार संपवणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. त्यामुळे सोनी कंपनीच्या नव्या पत्रकामुळे कपिल शर्मालाही दिलासा मिळाला आहे आणि चर्चांनाही पूर्णविराम मिळाला आहे. खरे तर मार्च किंवा एप्रिल महिन्यात करार वाढवण्याची प्रक्रिया पूर्ण होणे गरजेची होती. मात्र, कार्यक्रमाच्या सातत्याने घसरणार्‍या टीआरपीमुळे करार वाढवला गेला नव्हता. त्याचवेळी चॅनलवर द ड्रामा कंपनी लॉन्च करून एकप्रकारे कपिलला इशारा देण्यात आला होता. दरम्यान, कपिलसोबत आता लेखक राज शांडिल्य आता कपिलसोबत काम करणार आहेत.