राखीला बेड्या ठोका; न्यायालयाचे आदेश

0
159

नवी दिल्ली : अभिनेत्री राखी सावंतला महर्षी वाल्मीकिंंबद्दल आक्षेपार्ह विधान करणे चांगलेच महागात पडले आहे. तिचा अटकपूर्व जामीन अर्ज लुधियाना येथील न्यायालयाने फेटाळला असून, तिच्या अटकेचे आदेशही देण्यात आले आहेत. दरम्यान, या प्रकरणी पुढील सुनावणी ५ सप्टेंबरला होणार असून, ५ ऑगस्टला राखीला जिल्हा सत्र न्यायालयाने सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. तसेच ७ ऑगस्ट रोजी न्यायालयात शरण यावे, असे सांगितले होते. पण राखी सावंत न्यायालयात हजर राहू शकली नाही. राखी अमेरिकेत असल्याचे तिच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. जामिनासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी विनंतीही वकिलांनी अर्जाद्वारे जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश गुरबीर सिंग यांच्याकडे राखीच्या वतीने केली आहे. पण तिचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावत तिच्या अटकेचे आदेश दिले आहेत.