करणच्या जुळ्या मुलांचा फोटो वायरल

0
154

मुंबई : दिग्दर्शक आणि सिनेनिर्माता करण जोहरने रक्षाबंधनाच्या निमित्ताने पहिल्यांदा त्याच्या जुळ्या मुलांचा फोटो शेअर केला. या फोटोमध्ये करण जोहरची आई हिरु यश आणि रुही या मुलांसोबत दिसत आहे. यावर्षी सरोगसीच्या माध्यमातून या दोन मुलांचा जन्म झाला आहे. ज्यामध्ये एका मुलीचा समावेश आहे, तर एक मुलगा आहे. करण जोहरने मुलांचे नाव यश आणि रुही का ठेवले, यामागेही खास कारण आहे. करणने आपल्या मुलीचे रुही, तर मुलाचे यश असे नामकरण केले. करणचे वडील आणि दिवंगत निर्माते यश जोहर यांच्या नावावरून यश, तर आई हिरू जोहर यांच्या नावातील अक्षरांवरून रुही हे नाव ठेवण्यात आले आहे.