‘बादशाहो’चा नवा ट्रेलर

0
147

मुंबई : नुकताच दिग्दर्शक मिलन लुथरिया दिग्दर्शित आणि अजय देवगण, इम्रान हाश्मी, विद्युत जामवाल, संजय मिश्रा, इलियाना डिक्रुज आणि ईशा गुप्ता अशी मोठी स्टारकास्ट असलेल्या आगामी बहुचर्चीत ‘बादशाहो’ या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाकडे प्रेक्षकांना अधिक आकर्षित करण्यासाठी इम्रान हाश्मी आणि सनी लिओनीवर एक गाणे चित्रीत करण्यात आले आहेत. हे गाणे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच गाजत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अजय देवगण आणि इम्रान हाश्मी ही जोडी दुसर्‍यांना एकत्र बघायला मिळणार आहे. हा चित्रपट येत्या १ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.