यूट्यूबवर ‘डेस्पासितो’चा धुमाकूळ

0
148

मुंबई : यूट्यूबवर गेल्या काही दिवसांपासून एक गाणे धुमाकूळ घालत असून पोर्ट रिकोचा पॉप सिंगर लुईस फॉन्सी आणि डॅडी यांकी यांचे ‘डेस्पासितो’ हे गाणे चांगलेच चर्चेत आहे. अल्पावधीतच या गाण्याने विक्रम केला आहे. यूट्यूबवर ‘डेस्तासितो’ हे गाणे आतापर्यंतचे सर्वात जास्त पाहिले गेलेले गाणे ठरले असून आतापर्यंत तब्बल ३ अरब पेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. या महिन्याच्या सुरूवातीला विज खलीफाचे ‘सी यू अगेन’ हे गाणे अव्वल स्थानी होते. आता ‘डिस्पासितो’ या गाण्याने सर्वांना मागे टाकत पहिल्या क्रमांकावर विराजमान झाले आहे. ‘डेस्पासितो’चा अर्थ ‘हळू हळू’ असा होतो. हे एक स्पॅनिश गाणे असून याचे म्युझिक अनेकांच्या मनात घर करते आहे.