कंगनाच्या ‘सिमरन’चा ट्रेलर प्रदर्शित

0
156

मुंबई : आता आपल्या आगामी चित्रपटासाठी बॉलिवूडची ‘क्वीन’ कंगना राणावत सज्ज झाली असून नुकताच कंगनाच्या ‘सिमरन’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. कंगनाचा क्युट आणि बोल्ड अंदाज दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या ‘सिमरन’मध्ये पाहायला मिळतो. कंगनाचा या अगोदर आलेला ‘रंगून’ बॉक्स ऑफिसवर फिका पडला होता. परंतु, ‘सिमरन’चा ट्रेलर मात्र कंगना पुन्हा एकदा बॉक्सऑफिसवर धम्माल करण्यासाठी सज्ज असल्याचे दाखवतो. १५ सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.