उपजिल्हाधिकारी सिंधू रूजू

0
83

हैदराबाद, ९ ऑगस्ट 
रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारी स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू बुधवारी आंध्रप्रदेशात उपजिल्हाधिकारी पदावर रूजू झाली.
गोलापुडी येथे राज्य सचिवालयात सिंधू आपल्या आई-वडिलांसह दाखल झाली. सिंधूने भूमी प्रशासन विभागाचे मुख्य आयुक्त (सीसीएलए) अनिल चंद्र पुनेथा यांना रिपोर्ट केला. त्यानंतर शासकीय सेवेत दाखल होण्यासाठी औपचारिकपणे आवश्यक दस्तावेजावर तिने स्वाक्षरी केली आणि आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. गत महिन्यात सिंधूला राज्य सरकारमध्ये ग्रुप-आय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले. मुख्यमंत्रीचंद्राबाबू नायडू यांनी २९ जुलै रोजी सिंधूला नियुक्तीचे पत्र सोपविले होते. राज्य सरकारने सिंधूला ३० दिवसांच्या आत पदाचा कार्यभार स्वीकारण्यास म्हटले होते.   (वृत्तसंस्था)