संधी मिळालीच, तर कठोर परिश्रमाची फलश्रुती ः कुलदीप

0
75

कॅण्डी, ९ ऑगस्ट 
श्रीलंकेविरुद्धच्या तिसर्‍या कसोटी क्रिकेट सामन्यात खेळण्याची संधी मिळाली, तर ते माझ्या कठोर परिश्रमाचे बक्षीस असेल, अशी आशा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने व्यक्त केली.
अंतिम एकादशमध्ये या एका स्थानासाठी कुलदीपची स्पर्धा अक्षर पटेलशी आहे. अक्षरने निलंबित जडेजाच्या जागी संघात स्थान मिळविले. अक्षरला जरीही श्रीलंकेत संघात सामील होण्यास बोलाविले असले तरी आतापर्यंत प्रभावी प्रदर्शन करणारा कुलदीप अंतिम एकादशमध्ये स्थान मिळविण्यास यशस्वी राहील. तो या दौर्‍याच्या प्रारंभापासूनच तिसरा फिरकी गोलंदाज म्हणून संघासोबत आहे.
निःसंशय मी अतिशय उत्साहित आहो. मी आपल्या पदार्पणाच्या कसोटी सामन्याबाबतही उत्साहित होतो. त्यामुळे जर मला श्रीलंकेत खेळण्याची संधी मिळाली, तर मला अतिशय आनंद होईल. कारण ते माझ्या कठोर परिश्रमाचे फळ असेल. उत्साहित असण्यासोबतच मी नर्व्हससुद्धा आहे कारण मी उत्कृष्ट प्रदर्शन करू इच्छितो. पण मी खेळणार की नाही हे अद्याप स्पष्ट नाही.
सामना सुरू होण्यास अजून तीन दिवस शिल्लक आहे. परंतु जेव्हापासून येथे आलो आहे, तेव्हापासून रवी शास्त्रीसर माझे मनोबल वाढवित आहे, असे तो म्हणाला. (वृत्तसंस्था)