‘हिंदी-चिनी भाई भाई’ला पर्याय नाही

0
68

तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांनी दिला चर्चेवर भर
नवी दिल्ली, ९ ऑगस्ट 
मागील अनेक वर्षांपासून भारत आणि चीनला एकमेकांच्या शेजारी राहात आहे. त्यामुळे ‘हिंदी-चिनी भाई भाई’ या मंत्राशिवाय पर्याय नसल्याचे मत तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांनी व्यक्त केले. दोन्ही देशांनी चर्चेवर भर द्यावा, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
मागील काही दिवसांपासून भारत आणि चीनदरम्यान सीमेवरील डोकलामवरून मोठा तणाव निर्माण झाला आहे. या पृष्ठभूमीवर तिबेटी धर्मगुरू दलाई लामा प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
कोणत्याही देशातील वृत्तपत्रे आणि प्रसारमाध्यमांनी लोकांना सत्य परिस्थितीविषयी माहिती देणे आणि प्रबोधन करणे विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. आमच्या लहानशा तिबेटी समाजात पूर्णपणे लोकशाहीप्रणाली असून, मी लोकशाही व्यवस्थेचा पुरस्कर्ता आहे. लवकरच चिनी जनता आमची ही पद्धत अंगिकारेल आणि कम्युनिस्ट पक्षाला लोकशाहीचा अवलंब करावाचा लागेल, असे दलाई लामा यांनी ठामपणे सांगितले.
भारत आणि चीनला डोकलाम समस्यावर चर्चा आणि शांततेच्या माध्यमातूनच मार्ग काढावा लागेल. ‘हिंदी-चिनी भाई भाई’ याच मार्गाने गेल्यास हा तोडगा शक्य आहे.
भारत व चीन दोन्हीही सामर्थ्यशाली देश आहेत. काहीही झाले तरी आपल्याला एकमेकांच्या शेजारी राहायचे आहे, हे दोन्ही देशांनी कायम ध्यानात ठेवावे, अशी सूचनाही त्यांनी केली. (वृत्तसंस्था)