अश्‍विन, जडेजाला विश्रांती!

0
107

श्रीलंकेविरुद्धची एकदिवसीय मालिका

नवी दिल्ली, १० ऑगस्ट 
श्रीलंकेविरुद्धच्या सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेत फिरकी गोलंदाजांवर जास्त दडपण येत असल्यामुळे संघ व्यवस्थापन व राष्ट्रीय निवड समिती २० ऑगस्टपासून प्रारंभ होणार्‍या एकदिवसीय मालिकेसाठी रवीचंद्रन अश्‍विन व रवींद्र जडेजा यांना विश्रांती देण्याची शक्यता आहे. मोहम्मद शमीलासुद्धा विश्रांती देण्याची शक्यता आहे.
निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद हे सध्या कॅण्डीत असून अन्य सदस्य देवांग गांधी हे भारत अ संघासोबत दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍यावर आहेत. ते तिसरे सदस्य शरणदीप सिंग यांच्यासोबत १३ ऑगस्ट रोजी कॉन्फरन्स कॉलद्वारे संवाद साधून एकदिवसीय मालिकेसाठी संघाची निवड करतील.
या मालिकेत जडेजा व अश्‍विनने अनुक्रमे १०८.२ व १०८.३ षटके गोलंदाजी केली व १३ व ११ बळींची नोंद केली. तिसर्‍या कसोटीसाठी जडेजाला निलंबित केले आहे. अश्‍विन गोलंदाजीचे नेतृत्व करेल व या मालिकेच्या अखेरीस त्याचे १५० पेक्षा अधिक षटके होतील.
यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल व कृणाल पांड्याला यांच्यात शर्यत असून मर्यादित षटकाचा यॉर्कर तज्ज्ञ गोलंदाज जसप्रीत बुमराह हासुद्धा आहे. एक मोठा मुद्दा म्हणजे कर्णधार विराट कोहलीसंदर्भात. एकदिवसीय मालिकेसाठी स्वथ विराट विश्रांती घेऊ इच्छित नाही व तो खेळण्यास उत्सुक आहे. (वृत्तसंस्था)