साधी दिसणारी वस्तू अतिमूल्यवान!

0
211

लंडन, ११ ऑगस्ट 
मौल्यवान वस्तू म्हटलं की आपल्याला हिरे, माणके , पाचू यासारखी रत्ने किंवा सोने, प्लॅटिनियमसारखे धातूच डोळ्यांसमोर येतात. मात्र, काही वस्तू अशा आहेत की, ज्या पाहिल्या की त्यामध्ये काही विशेष वाटत नसले तरी त्यांचे मूल्य बरेच मोठे असते. छायाचित्रात दिसणारी दगडासारखी एखादी वस्तू जर समुद्रकिनारी आढळली तर ती साधी आहे, असे समजण्याचे कारण नाही. कारण ही वस्तू म्हणजे व्हेलने बाहेर टाकलेले एम्बरग्रीस असू शकते. त्याची किंमत सुमारे १६ कोटी, ८६ लाख रुपये असू शकते. मेणासारखी रचना असणारा हा पदार्थ ज्यावेळी व्हेल माशाच्या उलटीतून बाहेर येतो, त्यावेळी तो किनार्‍यावर दगडासारखा ठोस बनतो. त्याचे रूपडेही दगडासारखेच असल्याने अनेकांना तो ओळखूनही येत नाही. मात्र, हे व्हॅक्स अतिशय मौल्यवान असते. ते स्पर्म व्हेलच्या आतड्यात स्रवणार्‍या एका विशिष्ट पदार्थापासून बनलेला असतो. त्याचा उपयोग चक्क परफ्युम बनवण्यासाठी होतो. कोट्यवधी किमतीच्या या व्हेलच्या उलटीला जगभरात बरीच मागणी आहे आणि अनेक मच्छीमार यामुळे कोट्यधीशही झाले आहेत. (वृत्तसंस्था)