‘पहरेदार पिया की’ बंदसाठी ५० हजार स्वाक्षर्‍या

0
140

मुंबई : दुप्पट वयाच्या स्त्रीशी लग्न करणार्‍या एका लहान मुलाचे चित्रण करणारी पहरेदार पिया की ही मालिका बंद करावी, यासाठी ५०,००० पेक्षा जास्त लोकांनी ऑनलाईन याचिकेवर स्वाक्षर्‍या केल्या आहेत. ही मालिका गेल्या महिन्यात सुरू झाली होती. त्यातील विचित्र कथा आणि बालविवाहाचे उदात्तीकरण यावर सुरूवातीपासूनच टीका झाली होती. मानसी जैन नावाच्या एका संतप्त मुलीने चेंज.ऑर्ग या संकेतस्थळावर ही याचिका दाखल केली होती. ही मालिका बंद करण्यासाठी तिने माहिती व प्रसारणमंत्री स्मृती इराणी यांच्याकडे दाद मागितली आहे. आम्हाला या मालिकेवर बंदी हवी आहे. अशा मालिकांचा आमच्या मुलांवर परिणाम व्हावा, असे आम्हाला वाटत नाही, असे मानसीने म्हटले आहे. तिच्या या याचिकेला ५०,००० स्वाक्षर्‍या मिळाल्या असून ही संख्या वाढतच आहे. यात तेजस्वी वायंगणकर आणि अफान खान यांच्या मुख्य भूमिका आहेत.