हेमामालिनीच्या संगीत करीअरची सुरुवात

0
141

मुंबई : येत्या जन्माष्टमीला खासदार, नर्तिका व अभिनेत्री हेमामालिनी संगीत क्षेत्रात पदार्पण करणार आहे. हेमा गाण्यातही तरबेज आहे व त्याचा अनुभव जन्माष्टमीच्या दिवशी प्रसिद्ध होत असलेल्या तिच्या अल्बममधून घेता येणार आहे. मुंबईतील जुहू येथील इस्कॉन टेंपलमध्ये हेमाच्या आठ भजनांचा अल्बम ‘गोपाल को समर्पण‘ हा प्रदर्शित केला जात आहे. यातील भजने कवी नारायण अग्रवाल यांनी लिहिली असून त्यांना पं. शिवकुमार शर्मा, पं. हरिप्रसाद चौरसिया, पं. जसराज, राजनसाजन मिश्रा यांनी संगीताचा साज चढविला आहे. यातील भजने हेमामालिनी यांनी सुंदर गायली आहेत असे कवी अग्रवाल म्हणाले. हेमा सांगतात, या भजनांना चाली देणारे महान कलाकार आहेत त्यामुळे आपले गाणे कसे होणार याचा दबाव आला होता. मला रियाज करायला वेळ मिळाला नाही तरीही सर्वांच्या आग्रहाने व आशीर्वादामुळे हे करू शकले.