सायरस मिस्त्रींना तात्पुरता दिलासा

0
43

मुंबई, ११ ऑगस्ट 
टाटा समूहाचे पदच्युत अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या फौजदारी मानहानी दाव्याला मुंबई सत्र न्यायालयाने स्थगिती दिली आहे. यामुळे सायरस मिस्त्री यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आर. व्यंकटरामन् यांनी मिस्त्री यांच्याविरोधात ही याचिका दाखल करत, ५०० कोटी रुपयांचा मानहानी दावा दाखल केला होता.आर. व्यंकटरामन् यांची रीव्हिजन याचिका मात्र न्यायालयाने दाखल करून घेत या प्रकरणी कनिष्ठ न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीला स्थगिती दिली आहे,
नॅशनल कंपनी अपिलेट लॉ ट्रॅब्युनल समोर सुरू असलेल्या सुनावणीत व्यंकटरामन् यांनी जाणीवपूर्वक बर्‍याच बाबी उघड केल्या नसल्याचा युक्तिवाद सायरस मिस्त्री यांच्यावतीने ऍॅड. आबाद पोंडा यांनी केला. ४ मे २०१७ ला या संदर्भात दिलेल्या आदेशाविरोधात टाटा सन्सच्या अल्पसंख्यक शेअर होल्डर्सनी टाटा सन्समध्ये अनागोंदी कारभार सुरू असल्याचा दावा केला होता. त्यामुळे जोपर्यंत या दाव्याचा निर्णय होत नाही तोवर या मानहानी याचिकेवर सुनावणी घेऊ नये असा युक्तिवाद केल्यामुळे न्यायालयाने पुढील सुनावणी ११ सप्टेंबरपर्यंत तहकूब केली आहे. (वृत्तसंस्था)