अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे बेरोजगारांना पाच लाखांचे कर्ज

0
25

– खुल्या प्रवर्गातील बेरोजगार युवकांना लाभ
नागपूर, ११ ऑगस्ट
सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसाय सुरू करण्यासाठी पाच लाख रुपयांचे बीजभांडवल कर्ज अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे उपलब्ध करून देण्याची योजना राबविण्यात येत असून, या योजनेचा लाभ सर्व बेरोजगार युवकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे उपसंचालक डी. एम. गोस्वामी यांनी केले आहे.
अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्ज योजनेंतर्गत बेरोजगार उमेदवारांना पाच लाख रुपयांपर्यंत व्यवसायासाठी अर्थसाहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता कोणतेही महामंडळ कर्ज उपलब्ध करून देत नाही, अशा फक्त खुल्या प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी पाच लाख रुपयांची बीजभांडवल कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये राष्ट्रीयीकृत बँकेचा ६० टक्के सहभाग, महामंडळाचा ३५ टक्के तर उर्वरित सहभाग ५ टक्के अर्जदाराचा राहणार आहे. राष्ट्रीयीकृत बँकांनी मंजूर केलेल्या प्रकल्प रकमेच्या ३५ टक्के रक्कम महामंडळामार्फत बीजभांडवल म्हणून देण्यात येते. या रकमेवर दरवर्षी ४ टक्के व्याज आकारण्यात येते. बीजभांडवल कर्ज योजनेचा परतफेडीचा कालावधी पाच वर्षांचा आहे. या योजनेसंदर्भात ुुु.ीेक्षसरी.ारहरीुरूरा.ळप या वेबसाईटवर भेट दिल्यानंतर ळपींशीिीशपर्शीीीहळि (इंटरप्रेनरशीप) या ऑप्शनवर क्लिक करून अर्ज भरावा किंवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत क्र.१, सहावा माळा येथे संपर्क साधावा.
महामंडळाच्या कर्ज योजनेसाठी अर्जदार महाराष्ट्रातील निवासी व खुल्या प्रवर्गातील असावा. जिल्ह्यातील स्थायी वास्तव्य किमान तीन वर्षे असावे व वय १८ ते ४५ दरम्यान असावे. त्याचप्रमाणे अर्जदाराचे नाव जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात नाव नोंदविले असणे आवश्यक आहे. तसेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सहा लाखांच्या आत असावे आणि कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा, अशा अटी या योजनेच्या लाभासाठी असल्याची माहिती उपसंचालक डी. एम. गोस्वामी यांनी दिली.