व्हीएनआयटीचा अमेरिकेच्या विद्यापीठाशी ‘एमओयू’

0
69

नागपूर, ११ ऑगस्ट
विश्‍वेश्‍वरय्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्था आणि शिकागो येथील इलिनोइस इन्स्टिट्युशन ऑफ टेक्नॉलॉजी, युनिव्हर्सिटी ऑफ लिनोईस अँड युनिव्हर्सिटी ऑफ विसस्कॉनसीन-मेडिसन यांच्याशी सामंजस्य करार करण्यात आला. नुकतेच व्हीएनआयटी समूहाच्या व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष विश्राम जामदार यांना विद्यापीठाकडून आमंत्रित करण्यात आले होते. त्यानुसार विश्राम जामदार युएस दौर्‍यावर होते. दरम्यान त्यांनी हा करार केला.
करारामुळे दोन संस्थेच्या विद्यार्थ्यांमध्ये विविध अभ्यासक्रमाची देवाण-घेवाण होणार आहे. तसेच संशोधन आणि नवीन उपक्रमांना चालना मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे यातून व्हीएनआटीचे उत्तर अमेरिकेत अस्तित्व निर्माण होणार आहे. या दौर्‍यात विश्राम जामदार हे शिकागो येथे झालेल्या ‘नॉर्थ अमेरिका ऍल्युमनी मिट’मध्ये सहभागी झाले. त्यांनी परिषदेला संबोधित केले. यावेळी व्हीएनआयटीद्वारे राबविण्यात येणार्‍या विविध विकासात्मक उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. दिनेश जैन आणि मेधा नादगिर हे परिषदेचे आयोजक होते.