थिओ वॉल्कॉट म्हणतो ॐ नम: शिवाय

0
52

नवी दिल्ली, १२ ऑगस्ट 
इंग्लंडच्या अर्सेनल क्लबचा स्टार फुटबॉलपटू थिओ वॉल्कॉट सध्या त्याने काढलेल्या टॅटूमुळे चर्चेत आला आहे. वॉल्कॉटने त्याच्या पाठीवर ॐ नम: शिवाय टॅटू काढला आहे. टॅटूचा फोटो त्याने ट्विटरवर शेअर केला आहे.
“Open your heart, shed fear, hate or envy, to experience everlasting joy happiness” अशा भावनांसोबत वॉल्कॉटने फोटो शेअर केला आहे. या टॅटूमुळे अनेक भारतीयांनी वॉल्कॉटचे कौतुकही केले आहे.
पण, अक्षरांच्या चुकांमुळे त्याला टिकेलाही सामोरे जावे लागत आहे. वॉल्कॉटच्या चाहत्यांनी टॅटूमध्ये झालेली चूक सुधारून पुन्हा त्याचे फोटो ट्विट केले आहेत.(वृत्तसंस्था)