दुबईत स्वातंत्र्यदिनी ‘दंगल’फेम केक!

0
142

दुबई, १२ ऑगस्ट 
या वर्षीच्या भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अनुषंगाने दुबईत २६ लाख रुपयांचा केक तयार करण्यात आला आहे. सुमारे ५४ किलो वजनाच्या या केकची संकल्पना अभिनेता आमीर खानच्या ‘दंगल’ चित्रपटावर आधारित आहे.दुबईतील ब्रॉडवे बेकरीने हा केक खास भारताच्या ७० व्या स्वातंत्र्यदिनाचे निमित्त साधून तयार केला आहे. त्यांच्या एका विशेष ग्राहकाच्या इच्छेखातर हा केक तयार करण्यात आला, अशी माहिती बेकरीतील अधिकार्‍याने दिली.केक तयार करण्यासाठी शुगर फॉन्डंट, चॉकलेट स्पंज, चॉकलेट गनाश, बेल्जिअन डार्क चॉकलेट आणि ७५ ग्रॅम एडिबल गोल्ड पावडरचा वापर करण्यात आला.
‘दंगल’ चित्रपटात आमिर खान आपल्या दोन मुलींना शेतात प्रशिक्षण देत असतानाचे चित्र या केकवर आहे. हा केक जगातील सर्वात महागडा असल्याचा दावा ब्रॉडवे बेकरीने केला आहे. केक तयार करायला तीन आठवड्यांपेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागली आणि अडीचशे लोक हा केक खाऊ शकतील, असे सांगण्यात आले. (वृत्तसंस्था)