कसोटीत सलग ७ अर्धशतके

0
78

राहुलने मोडले दिग्गजांचे विक्रम
कँडी, १२ ऑगस्ट 
श्रीलंकेविरुद्धच्या तिसर्‍या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात के. एल. राहुलने शानदार अर्धशतक झळकावले. हे त्याचे कसोटीतील सलग सातवे अर्धशतक ठरले. त्याने या अर्धशतकासोबतच दिग्गजांचे विक्रम मोडीत काढले आहेत.राहुलच्या अर्धशतकांची मालिका यावर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध बंगळुरु कसोटीपासून सुरु झाली. त्यानंतर दुखापतीमुळे काही सामन्यांपासून राहुलला दूर रहावे लागले. मात्र त्याच्या खेळीवर मैदानापासून दूर राहिल्याचा परिणाम बिलकुल जाणवला नाही. त्याने पुनरागमन करताच पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केले आहे.
भारताकडून सलग ७ अर्धशतके ठोकण्याचा विक्रम करणारा राहुल एकमेव फलंदाज आहे. गुंडप्पा विश्‍वनाथ आणि राहुल द्रविड यांच्या नावावर प्रत्येकी सहा सलग अर्धशतके ठोकण्याचा विक्रम आहे. के.एल. राहुलने दोघांचाही विक्रम मोडीत काढला. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतके ठोकण्याच्या बाबतीत राहुलने अँडी फ्लॉवर, शिवनारायण चंद्रपॉल, कुमार संगकारा आणि ख्रिस रोजर्स यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. या सर्वांनी सलग ७ वेळा अर्धशतक ठोकले आहेत.
केएल राहुलची ७ अर्धशतके
१) मार्च २०१७, ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९० धावा
२) मार्च २०१७, ऑस्ट्रेलियाविरुद्ध   ५१ धावा
३) मार्च २०१७, ऑस्ट्रेलियाविरुद्ध ६७ धावा
४) मार्च २०१७, ऑस्ट्रेलियाविरुद्ध ६० धावा
५) मार्च २०१७, ऑस्ट्रेलियाविरुद्ध   ५१ धावा
६) ऑगस्ट २०१७, श्रीलंकेविरुद्ध ५७ धावा
७) १२ ऑगस्ट २०१७, श्रीलंकेविरुद्ध ८५ धावा