ट्रायल रनसाठी मेट्रो सज्ज

0
62

-२५ हजार व्होल्टचा पुरवठा
-निर्धारित तिथीपूर्वी तयारी
नागपूर, १२ ऑगस्ट
नागपुरातील बहुचर्चित मेट्रो प्रकल्प आता पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करीत असून थेट विद्युत पुरवठ्यावर मेट्रो धावण्यासाठीची ओव्हरहेड लाईन सक्रिय झाली आहे. आज मेट्रोला २५ हजार व्होल्टचा वीजपुरवठा केला आणि ती स्वयंप्रेरणेने धावू लागली. या कामासाठी १५ ऑगस्ट ही तिथी निर्धारित करण्यात आली होती. पण तीन दिवसांपूर्वीच हे काम पूर्ण करण्यात आले. मागील दोन दिवसांपासून ओव्हरहेड वायर कनेक्शनची चाचणी सुरू होती. आतापर्यंत मेट्रोचे डबे ओढून नेण्यासाठी बुलंद या इलेक्ट्रिक इंजिनचा वापर करण्यात येत होता. पण आज त्याची गरज भासली नाही. वीजपुरवठा करून हॉर्न देताच मेट्रो रुळावर धावू लागली. आता रेल्वे सुरक्षा अधिकार्‍यांची चमू दिल्लीहून नागपुरात येईल व त्यानंतर ही चमू सखोल चाचणी करेल व त्यानंतर प्रत्यक्ष वाहतूक सुरू होईल.