साप्ताहिक राशिभविष्य

0
375

२० ऑगस्ट ते २६ ऑगस्ट २०१७
मेष- कुटुंबात समाधान राहील
आपला राशीस्वामी मंगळ चंद्रासोबत चतुर्थस्थानात धनयोग करीत आहे. या राशीच्या मंडळींना सध्याचा काळ कौटुंबिक सुख, समाधान आणि सौहर्द्राच्या दृष्टीने उपयुक्त आहे. कुटुंबात मंगलकार्ये, विवाहादी कार्यक्रम, धार्मिक सोहोळे आयोजित केले जाऊ शकतात. घरात पाहुणे, नातेवाईकांची वर्दळ राहील. भागीदारीच्या व्यवसायात असणार्‍या मंडळींना आठवडा अर्थलाभी आहे. मुलांकडून काही चांगल्या बातम्या कळू शकतात. सत्पुरुषांचा सहवास लाभण्याचेदेखील योग येऊ शकतात. शुभ दिनांक- २०,२१,२२,२३.

वृषभ-  भाग्याची उत्तम साथ
आपल्या राशीस्वामी शुक्र या आठवड्यात २१ तारखेला राश्यांतर करून पराक्रम स्थानात व्ययेश मंगळासोबत  जाणार आहे. या काळात आपणांस भाग्याची उत्तम साथ लाभणार आहे. अचानक काही चांगल्या घटना घडतील. विशेषतः युवा वर्गाला नोकरी-व्यवसाय-विवाह अशा भाग्योदयकारक घटनांचे योग यावेत. काहींना विदेश गमनासाठी उत्तम संधी लाभू शकते. नोकरी, शिक्षण किंवा पर्यटनासाठी देखील विदेशात जायचे स्वप्न पुरे व्हावयास हवे. शुक्र- मंगळ युतीमुळे काही खर्चिक योग संभवतात.  शुभ दिनांक- २१,२२,२३,२५.

मिथुन- जोमाने कामाला लागा
या आठवड्यात आपल्याला अतिशय जोमाने, प्रयत्नांची शिकस्त करून आपली कामें पूर्णत्वास न्यावी लागतील. भागीदारीच्या व्यवहारात असाल तर काहीसे मिळते-जुळते घेणेच फायद्याचे ठरेल. षष्टातला शनि प्रकृतीच्या तक्रारी निर्माण करू शकतो. लाभेश मंगळ व व्ययेश शुक्र अचानक व मोठ्या खर्चाचे संकट उभे राहण्याचे संकेत देत आहेत. त्यामुळे या आठवड्यात आपणांस सकर्तता आवश्यक आहे. दरम्यान युवा वर्गाला नोकरी-व्यवसाय-विवाह अशा भाग्योदयकारक घटनांचे योग यावेत.  शुभ दिनांक- २१, २२,२४,२६.

कर्क- अनपेक्षित, संमिश्र घटना
आपला राशीस्वामी चंद्र या आठवड्याच्या प्रारंभी आपल्याच राशीत मंगलासोबत धनयोग करीत आहे. एकुणा ग्रहदशा पाहता आठवडा तसा बराच संमिश्र घटनांनी युक्त राहील. काही अतिशय उपयोगी व भाग्यकारक घटना घडतानाच मनाचा विरस कराणार्‍या, प्रसंगी काही मोठ्या अनपेक्षित घटनांचा आघातही सहन करावा लागू शकतो. काहींना चंद्र-राहू सहवासामुळे भ्रमित झाल्यासारखेदेखील होऊ शकते. या काळात महत्त्वाचे निर्णय घेताना सावध राहावयास हवे. खर्च करताना भान ठेवायला हवे. आश्‍वासनांना बळी पडू नका. काहींना शनि प्रकृतीच्या तक्रारी निर्माण करू शकतो. वाहने सांभाळून चालवावीत. शुभ दिनांक- १८,२१,२२.

सिंह- मानसिक, आर्थिक समाधान
राशीस्वामी रवि आपल्याच राशीत असल्याने मानसिक व आर्थिक दृष्ट्या हा आठवडा आपणांस उत्तम जावा. एखादेवेळी काहींना याची सुरुवात खर्चिक व त्रासदायक ठरू शकते, मात्र आठवड्याच्या पूर्वार्धातच अनेक चांगल्या बातम्या कळतील. मुलाबाळांची प्रगती होईल. युवा वर्गास नोकरी-व्यवसाय, परीक्षेत यश मिळेल. काहींच्या विवाहादी योगासंबंधी वेगवान हालचाली घडू शकतील. विशेषतः व्यावसायिक वर्गाला आठवड्याचा उत्तरार्ध आर्थिक प्रगती करणारा ठरेल. व्यवसाय वाढ, नवे प्रस्ताव फायद्याचे ठरतील. नोकरी, शिक्षण किंवा पर्यटनासाठीदेखील विदेशात जायचे स्वप्न पुरे व्हावयास हवे. शुभ दिनांक- २१,२३, २४,२४.

कन्या-  अधिक प्रयत्नांची गरज
आपला रासीस्वामी बुध व्ययस्थानात रवि व राहू सोबत आहे. त्याने आपल्या बाबतीत सारे चांगले करण्याचा विडा उचललेला आहे. गुरुच्या दृष्टीमुळे या राशीच्या युवा वर्गाला विवाहादीकांचे उत्तम योग निर्माण होऊ शकतात. नोकरी-व्यवसायात असणार्‍यांना चांगल्या संधी चालून येण्याची शक्यता आहे. विशेषतः व्यावसायिक वर्गाला आठवड्याचा उत्तरार्ध आर्थिक प्रगती करणारा ठरेल. व्यवसाय वाढ, नवे प्रस्ताव फायद्याचे ठरतील. बुध व्ययेश रविसोबत असल्याने यशासाठी जरा अधिक प्रयत्न करावे लागतील. काहींना मोठा खर्चदेखील उचलावा लागू शकतो.शुभ दिनांक- २१,२२,२३, २४.

तुला-  व्यावसायिक प्रगतीचा काळ
या आठवड्यात २१ तारखेला आपला राशीस्वामी शुक्र धनेश मंगळासोबत दशम स्थानात येत आहे. हा आठवडा आपणांस प्रामुख्याने व्यावसायिक प्रगतीकारक ठरावा. युवा वर्गास नोकरीच्या व व्यवसायाच्या उत्तम संधी चालून येतील. भागीदारीच्या व्यवसायात असणार्‍यांनादेखील उत्तम यश मिळू शकेल. नोकरीत बदल किंवा व्यवसाय विस्तारासाठी उत्तम काळ. काहींना या आठवड्यात वाहन खरेदी, स्थावराबाबत महत्त्वाचे व्यवहार, सहली-प्रवासाच्या योजना आखता येतील. युवांना विवाहादी योग संभवतात. सणासुदीच्या दिवसांमध्ये मात्र जरा खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. शुभ दिनांक- २१.२३,२४, २६.

वृश्‍चिक-  महत्त्वाच्या घटनांची पायाभरणी
आपला राशीस्वामी मंगळ २१ तारखेला व्ययेश शुक्रासोबत भाग्य स्थानात शुभयोग करणार आहे. जीवनातील काही महत्त्वाच्या घटनांची पायाभरणी करणारा हा काळ आहे. कुटुंबात मंगलकार्ये, विवाहादी कार्यक्रम, धार्मिक सोहोळे आयोजित केले जाऊ शकतात. यामुळे घरात पाहुणे, नातेवाईकांची वर्दळ राहील. आनंदाचे वातावरण राहील. आर्थिकदृष्ट्या पाहता हा काळ जेमतेम राहील, मात्र साडेसातीच्या अंतिम टप्यात काही चांगले होण्याचा क्रम आता सुरू होईल असे दिसते. नोकरी, व्यवसाय, विदेश गमन यासाठीच्या काही घटना या कालात वेग घेऊ शकतात. काहींना नोकरी-व्यवसायात बदल करावा लागू शकतो. शुभ दिनांक- २०,२२,२४,२६.

धनु-  मेहनत, मात्र असमाधान
आपला राशीस्वामी गुरू दशमस्थानात आहे. नोकरी-व्यवसायात चांगली स्थिती असली तरी समाधान मात्र नसेल. जबाबदारी वाढेल, मात्र आर्थिक लाभ शून्य. नवीन नोकरीच्या शोधात असणार्‍यांना काही काळ थांबावे लागू शकेल. पुढे मात्र युवा वर्गास नोकरीसाठी चांगल्या संधी मिळू शकतील. विवाहेच्छु युवा वर्गास जोडीदार लाभण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. दरम्यान घर, जमीन, वाहन खरेदीच्या संदर्भात हालचाली घडू शकतात. मंगळ व शनि मात्र प्रकृतीची काळजी घेण्यास सुचवीत आहेत. वाहने सांभाळून चालवा. खर्चाला आवर घाला.  शुभ दिनांक- २२,२३,२४, २५.

मकर-  कामाचे कौतुक होईल
आपल्या सप्तम स्थानी लाभेश मंगळ व चंद्राने धनयोग बनविला असतानाच २१ तारखेला राश्यंतर करून शुक्रदेखील तेथे येत आहे. आपल्या योजनांना उत्तम बळ देऊन त्याची पुरेपूर फले प्राप्त करून देणारा हा काळ आहे. त्यामुळे या संधीचा लाभ घेऊन आपल्या प्रलंबित कामांना मूर्त रूप देण्याचा प्रयत्न करू शकता. भाग्यस्थानात असलेला गुरू आपल्या यशाचे, कामाचे कौतुक करवेल. उत्तम प्रसिद्धी मिळेल. काहींना विदेशात जाण्याच्या योजना साकार करता येऊ शकतील. कुटुंबात आनंददायी वातावरण राहील. मंगलकार्ये, विवाहादी कार्यक्रम, धार्मिक सोहोळे आयोजित केले जाऊ शकतात. शुभ दिनांक- २०,२२,२३,२५.

कुंभ-  खर्चाला वाटा फुटणार
आपला राशीस्वामी शनि दशम स्थानात असून राशीत केतू विराजमान आहे. मंगळ-शुक्राच्या उपस्थितीने मात्र खर्च वाढेल. व्यसन वृद्धीचाहीदेखील धोका आहे. एखादेवेळी आर्थिक पेच निर्माण होऊ शकतो. पैसा विलंबाने येईल. अशातच आरोग्याची चिंता सतावत राहील. काही जुन्या तक्रारी असल्यास त्या डोके वर काढणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. थोडक्यात आर्थिक आणि आरोग्याबाबत सतर्क असणे आवश्यक राहील. कुटुंबात मात्र आनंददायी वातावरण राहील. मंगलकार्ये, धार्मिक सोहोळे आयोजित केले जाऊ शकतात. शुभ दिनांक- २०,२१,२४,२५.

मीन- सरकारी कामात यश
राशीस्वामी गुरू सप्तमस्थानातून आपल्या राशीला सर्व शुभत्व प्रदान करीत आहे. बव्हंशी शुभ असलेली ही ग्रहस्थिती आपणांस यशदायी ठरणार आहे. विशेषतः सरकारी कामात आपल्याला उत्तम यश मिळू शकेल. शुक्र- मंगळाच्या उपस्थितीमुळे काही आकस्मित लाभाचे प्रसंग उद्भवू शकतात. षष्ठातील रवि-बुध-राहू नोकरी व्यवसायात काही चांगले योग घडवू शकतील.  कुटुंबात काही चांगले व मंगलमय प्रसंग, धार्मिक सोहोळे साजरे होऊ शकतात. विशेषतः विवाहोत्सुक युवा वर्गास अतिशय चांंगले योग यावेत. आर्थिक तसेच आरोग्याची बाजू उत्तम राहील. नोकरीत बदल किंवा व्यवसाय विस्तार करणार्‍यांनादेखील योग्य काळ. वाहन खरेदी, स्थावराबाबत महत्त्वाचे व्यवहार, सहली-प्रवासाच्या योजना आखता येतील.शुभ दिनांक- २०,२१,२३,२५.
–  मिलिंद माधव ठेंगडी (ज्योतिषशास्त्री)/ ८६००१०५७४६