बाळकृष्ण घिसड यांचे निधन

0
150

मूर्तिजापूर, १३ ऑक्टोबर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक बाळकृष्ण दत्तात्रय उर्फ दादा घिसड (९२) यांचे मंगळवारी अल्प आजारानेे पुणे येथे निधन झाले. मूळ वाशीम येथील दादा घिसड हे डॉ. हेडगेवार यांनी वाशीम येथे सुरू केलेल्या पहिल्या संघ शाखेचे स्वयंसेवक होते.
डॉ. हेडगेवार ते डॉ. मोहनजी भागवत अशा चारही सरसंघचालकांशी त्यांचे व्यक्तिगत संबंध होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, सहा मुली, नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे. बुधवारी पुणे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.