हार्वे वादळाचा तेलुगू नागरिकांना जबर फटका

0
210

 प्रत्येकी सरासरी ३५ लाखांचे नुकसान
ह्युस्टन, १ सप्टेंबर 
ह्युस्टनमध्ये हार्वे वादळाचा मोठा आर्थिक फटका तेथे वास्तव्यास असलेल्या तेलुगु नागरिकांना बसला आहे. तेथील प्रत्येक तेलुगु घराचे सरासरी ५० हजार डॉलरचे (३५ लाख रुपये) नुकसान झाल्याची माहिती आहे. बहुसंख्य तेलुगु भाषक ग्रेटर ह्युस्टनमध्ये राहत असून, तेथील अनेक घरांची व मालमत्तेची हानी झाली आहे.
अमेरिकेच्या इतिहासात हार्वे वादळ हे भयंकर नैसर्गिक संकट ठरले असून, त्याने टेक्सासमध्ये १६० अब्ज डॉलरची आर्थिक हानी केली आहे. या वादळाने ३८ जणांचा बळी घेतला असून, कित्येक हजार लोकांना बेघर केले आहे.
अशा नैसर्गिक संकटांना विम्याचे संरक्षण मिळत नसल्यामुळे ती कुटुंबे काळजीत आहेत. या नैसर्गिक संकटाचे स्वरूपच फार मोठे होते. त्यामुळे सरकार पीडितांना काही प्रमाणात आर्थिक मदत करील अशी आशा आहे. परंतु त्याची कोणालाही खात्री कोणालाही नाही. सध्या प्रत्येक जण जीविताची काळजी करीत आहे.
कॅटी, शुगरलँड, सायप्रस आणि बेलायरमध्ये १० हजार तेलुगु कुटुंबे (किमान ५० हजार लोकसंख्या) वास्तव्यास आहेत. त्या प्रत्येक कुटुंबाचे सरासरी वार्षिक उत्पन्न ७५ हजार डॉलर एवढे आहे. सॉफ्टवेअर इंजिनीअर्सशिवाय अनेक डॉक्टर्स व व्यावसायिकही तिथे राहतात. त्या सर्वांना पुन्हा उभे राहण्यासाठी कर्जाचाच आधार घ्यावा लागेल, कारण त्यांच्याकडे बँकांत पुरेशी बचत नाही. गेल्या बुधवारी टेक्सासच्या सीमेजवळच्या लुईसियाना किनार्‍याजवळ हे वादळ धडकले व त्यामुळे विक्रमी असा पाऊस झाला. भयंकर हानी करणारा पूर आला. या वादळाने अमेरिकेच्या इतिहासात सर्वात मोठा पाऊस आणला. टेक्सासमध्ये गेल्या शुक्रवारी ५२ इंचाहून अधिक पाऊस पडला.
शहरातील २० जण अद्याही बेपत्ता आहेत. ह्युस्टन शहराचा काही भाग हा काही आठवडे किंवा काही महिन्यांसाठी राहण्यायोग्य नाही, असे ऍक्युवेदरचे अध्यक्ष यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)