एका दिवसात झाली अब्जाधीश!

0
270

वॉशिंग्टन, १ सप्टेंबर 
एका दिवसात ही महिला अब्जाधीश झाली आहे. आता अचानक हे कसे काय, असा प्रश्‍न तुम्हालाही पडला असेल. तर मॅसेच्युसेट्स येथे राहणार्‍या मेविस वांगजिक ही ५३ वर्षीय महिला लॉटरीमध्ये चक्क ५०० अरब रुपयांची जॅकपॉट लॉटरी जिंकली आहे.
पॉवरबॉल ड्रॉइंग प्रकारातली लॉटरीमध्ये तिने इतकी मोठी रक्कम जिंकली. एखाद्या व्यक्तीने इतक्या मोठ्या रकमेची लॉटरी जिंकण्याचा हा अमेरिकन लॉटरीच्या इतिहासातील पहिलाच प्रसंग आहे. आपला ३१ वर्षाचा मुलगा आणि २६ वर्षीय मुलीबरोबर बक्षिसाचा धनादेश घ्यायला आलेल्या मेविस यांच्या चेहर्‍यावरील आनंद पाहता क्षणी दिसत होता. यावेळी बोलताना त्या थोड्या भावूक झाल्या. मागील ३२ वर्षांपासून स्प्रिंगफील्ड रुग्णालयामध्ये काम करणार्‍या मेविस यांनी लॉटरी लागल्यानंतर नोकरी सोडून दिली. मला लॉटरी लागल्याचे समजताच मी रुग्णालयात फोन केला आणि मी आता यापुढे रुग्णालयामध्ये येणार नाही, असे सांगितले. पॉवरबॉलने लॉटरी जिंकणार्‍या तिकीटाचा क्रमांक त्यांच्या वेबसाईटवर अपडेट केला. त्यावेळी माझ्या एका मित्राने मला फोन करुन लॉटरी तिकीटचा क्रमांक तपासून घेण्यास सांगितले. मी लॉटरी जिंकू शकत नाही असे त्याला ठामपणे सांगितले. मात्र खरोखरच मी जिंकले तेव्हा मला हे खरे आहे की स्वप्न यावर विश्‍वाास बसत नव्हता. (वृत्तसंस्था)