सोने-चांदी महागले

0
61

मुंबई, २ सप्टेंबर 
सणासुदीच्या निमित्ताने सराफांकडून मागणी वाढल्याने शुक्रवारी सोने आणि चांदीच्या भावात वाढ झाली. सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅमला २७७ रुपयांनी वधारला आणि २९ हजार ७५५ रुपयांवर बंद झाला. चांदीच्या भावात प्रति किलोला ३९१ रुपयांनी वाढ झाली आणि चांदीचा भाव ३९ हजार ९५५ रुपयांवर बंद झाला. जागतिक बाजारात मात्र मूल्यवान धातूच्या किमतींमध्ये काही प्रमाणात घसरण झाली. अमेरिकेच्या रोजगार आकडेवारीच्या पृष्ठभूमीवर गुंतवणूकदारांनी सोन्याची विक्री करून नफावसुली केली. ज्यामुळे सोन्याचा भाव प्रति तोळा ०.३ टक्क्याने घसरून १ हजार ३१८.१६ डॉलर्सवर बंद झाला. चांदीच्या भावात ०.४ टक्क्यांची घट झाली असून प्रति किलो १७.५० वर बंद झाला. (वृत्तसंस्था)