राज्यात प्लॅस्टिकवर पूर्णपणे बंदी घाला

0
65

उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई, २ सप्टेंबर 
आपल्याकडे संकटे आली की शहाणपण येते मात्र, प्रत्येक शहाणपणासाठी संकटाची गरज नसते. सरकारने प्लॅस्टिकवर पूर्णपणे बंदी आणण्याचा विचार करावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया आणि त्याच्या साधनांचे वरळीत प्रदर्शन मांडण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या उद्‌घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि बिग बी अमिताभ बच्चन उपस्थित होते. दरम्यान, कचरा व्यवस्थापन कसे करायचे ते प्रदर्शनाच्या माध्यमातून सांगणार्‍या महापालिकेचे उद्धव ठाकरेंनी कौतुकही केले. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी महासिटी कंपोस्ट या राज्य सरकारच्या उपक्रमाची माहिती दिली. तर उद्धव ठाकरे यांनी प्लॅस्टिकवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली.
अमिताभ बच्चन यांनी यावेळी मंगळवारच्या पावसात रस्त्यावर उतरून लोकांना मदत करणार्‍या महापालिका कर्मचारी आणि पोलिसांचे कौतुक केले. शिवाय त्यांनी स्वच्छतेची सुरुवात स्वतःपासून करावी, असेही आवाहन केले.  (वृत्तसंस्था)