ग्रामपंचायत मतदानाची तारीख बदला : अशोक चव्हाण

0
86

बई, ५ सप्टेंबर 
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सुमारे साडेसात हजार ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार दुसर्‍या टप्प्यात १४ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. परंतु, याच दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिन असल्याने आयोगाने ही तारीख बदलावी, अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी आज सोमवारी पत्रकारांशी बोलताना केली.
१४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. त्यामुळे या दिवशी डॉ. आंबेडकरांचे अनुयायी लाखोंच्या संख्येत नागपूर दीक्षाभूमी आणि दादरच्या चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी जात असतात. याच दिवशी राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान जाहीर केल्याने मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाची १४ ऑक्टोबर ही तारीख बदलून दुसरी तारीख जाहीर करावी, असे ते म्हणाले. या संदर्भात कॉंग्रेसचे शिष्टमंडळ निवडणूक आयुक्तांची भेटही घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. दीपक अमरापूरकर यांच्या मृत्युमुळे मुंबईने एक निष्णात डॉक्टर गमावला असून त्यांचा मृत्यू प्रशासकीय हलगर्जीचा बळी असल्याची टीका चव्हाण यांनी केली. घ(वृत्तसंस्था)