अडीच लाख किमतीचा निकॉन डी ८५० कॅमेरा!

0
50

मुंबई, ५ सप्टेंबर  

छायाचित्र काढण्याचा छंद जोपासायचा म्हटला की तेवढाच तादकीचा कॅमेराही असावा लागतो. अशाच कॅमेर्‍यांना छायाचित्रकाराच्या कल्पकतेची जेव्हा जोड मिळते तेव्हाच एक क्रांती घडते. नेमकी हीच क्रांती घडविणार्‍या फोटोप्रेमींसाठी निकॉनने आपला नवीन कॅमेरा भारतीय बाजारात आणला असून, निकॉन इंडियाने सोमवारी २ लाख ५४ हजार ९५० रुपयांचा निकॉन डी ८५० कॅमेरा सादर केला आहे. हा कॅमेरा ४७.५ मेगापिक्सलचा बीएसआय सीएमओएस सेंसरचा आहे. केवळ या मोबाईलच्या बॉडीची किंमत २,५४,९५० रुपये आहे. तर एएफ-एस निकर २४-१२० एमएम ईडी वीआर लेन्सची किंमत २ लाख ९९ हजार ९५० रुपये ठेवण्यात आली आहे. हा निकॉनचा पहिला डीएसएलआर आहे, जो बीएसआय सीएमओएस सेंसरसह उपलब्ध आहे. यामुळे फोटो आणि प्रकाश अधिक कुशलतेने टिपता येतात. या कॅमेर्‍यात एक्सपीड ५ इमेज प्रोसेसिंग इंजिन आहे, जो ९ फ्रेम प्रति सेकंदाने शूटिंग करू शकतो.हा निकॉन डी ८५० हा एक क्रांती घडविणारा कॅमेरा असून,  कॅमेर्‍याच्या जागतिक स्पर्धेत हा मैलाचा दगड ठरेल, असा विश्‍वास कंपनीने व्यक्त केला आहे. भारत आणि जगभरातील फोटोप्रेमींना हा कॅमेरा नक्कीच आवडेल असाही विश्‍वास कंपनीला आहे.