दिवसातून तीन वेळा होतो सूर्योदय-सूर्यास्त!

0
296

न्यूयॉर्क, ६ सप्टेंबर

पृथ्वीला एकच नैसर्गिक उपग्रह म्हणजे चंद्र आहे. मात्र, गुरू किंवा शनीसारख्या ग्रहांच्या आसमंतात साठाहून अधिक चंद्र असतात! आपली ग्रहमालिका एकाच तार्‍याच्या म्हणजे सूर्याच्या भोवती फिरत असते. मात्र, अंतराळाच्या अफाट पसार्‍यात असेही काही ग्रह आहेत ज्यांचे सूर्य अनेक आहेत. अशाच एका ग्रहाचा शोध लावण्यात आला आहे. हा ग्रह तीन तार्‍यांभोवती प्रदक्षिणा घालतो. त्यामुळे या ग्रहावर तीन वेळा सूर्योदय आणि सूर्यास्त होतो!या ग्रहाचे वस्तुमान आपल्या ग्रहमालिकेतील गुरू या सर्वात मोठ्या आणि जुन्या ग्रहापेक्षा चारपट अधिक आहे. हा ग्रह पृथ्वीपासून ३४० प्रकाशवर्ष अंतरावर आहे. त्याला संशोधकांनी ‘एचडी-१३१३९९ बी’ असे नाव दिले आहे. हा ग्रह तुलनेने अगदी तरुण आहे. त्याचे वय १.६ कोटी वर्षे आहे. पृथ्वीचे वय सध्या ४.५ अब्ज वर्षे इतके आहे. ज्या ग्रहाचे वस्तुमान अधिक असते, तितका तो लवकर थंड होतो. हा ग्रहही असाच आहे. एका खुल्या तारकासमूहात त्याचे अस्तित्व असून संशोधक कुतुहलाने त्याचे निरीक्षण करीत आहेत. (वृत्तसंस्था)