लष्करी पोलिसांमध्ये आता महिलांची भरती

0
31

नवी दिल्ली, ८ सप्टेंबर 
लष्करी पोलिस दलात आता महिलांनाही सहभागी होता येणार आहे. लष्कराने याबाबतच्या योजनेला अंतिम स्वरूप दिले आहे. लष्करातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने याबाबतची माहिती आज शुक्रवारी दिली.
लष्करात स्त्री-पुरुष मतभेद कायमचे संपुष्टात आणण्यासाठी हे धाडसी पाऊल उचलण्यात आले आहे. प्रत्येक वर्षी ५२ महिला, याप्रमाणे सुमारे ८०० महिलांना लष्करी पोलिस दलात सहभागी करण्यात येणार आहे, असे लेफ्ट. जनरल अश्‍वनी कुमार यांनी पत्रकारांना सांगितले.
अलीकडेच वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनीही याबाबतचे संकेत दिले होते. महिलांना लष्करी पोलिस दलात सहभागी करून घेण्याच्या दिशेने आम्ही पावले उचलणार आहोत आणि ही प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे, असे जनरल रावत यांनी स्पष्ट केले होते.
भारतीय लष्करी दला स्त्री-पुरुष गुन्हेगारी घटनांचा तपास करण्यासाठी आम्हाला महिलांचीही आवश्यक आहे. महिलांची लष्करात भरती झाल्यानंतर त्यांची या तपासात मोठी मदत मिळणार आहे, असे लेफ्ट. जनरल कुमार यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)