साप्ताहिक राशिभविष्य

0
363

१० सप्टेंबर ते १६ सप्टेंबर २०१७
मेष-  कलागुणांना वाव मिळेल
या आठवड्यातील ग्रहस्थितीचा विचार करता साधारणतः कला व क्रीडा क्षेत्रात असणार्‍या या राशींच्या मंडळींना शुभ काळ आहे. आपल्या कलागुणांचे कौतुक होईल, त्यातून उत्तम आर्थिक लाभ देखील मिळू शकेल. काहींना मात्र आरोग्याशी संबंधित काही तक्रारी निर्माण होऊ शकतात. विशेषतः उष्णताजन्य त्रास सहन करावा लागू शकतो. तरुण वर्गाला आलेल्या काही शुभ संधी हातून निसटतांना जाणवतील. विशेषतः आठवड्याच्या शेवटी शेवटी असे अनुभव हमखास येऊ शकतात. त्यामुळे सध्या आहे त्या स्थितीतच समाधान मानणे योग्य ठरावे. नवे काही सुरू करू नये. शुभ दिनांक- १०,११,१२,१३.

वृषभ-  विविध आघाड्यांवर यश
या राशीच्या मंडळींना हा आठवडा अतिशय शुभ व अनुकूल ग्रहयोग देणारा आहे. मधले दोन दिवस वगळता संपूर्ण काळ सुखवर्धक, समाधानाचा आणि उत्साहाचा जावा. नवीन ओळखी, पत्रव्यवहार, नव्या कार्याचा शुभारंभ, कार्यविस्तार अशा विविध आघाड्यांवर यश मिळू शकणार आहे. त्यामुळे निर्धाराने पुढे पाऊल टाकवयास हरकत नसावी. भागीदारीत व्यवसाय करीत असणार्‍यांना मधला काहीसा काळ कटकट व गैरसमज निर्माण करणारा ठरू शकतो. जरा सामंजस्याने घेतले तर काही अनर्थ, मतभेद निश्‍चितपणे टाळता येऊ शकतील. तरुणांना व महिलांना उत्तम काळ. शुभ दिनांक- १२,१३,१४,१५.

मिथुन-  प्रगतीच्या घटनांना चालना
हा आठवडा आपणांस जणू प्रगतीकारक पर्व ठरू शकतो. पराक्रमात बसलेला राशीस्वामी बुध काही उत्कर्ष करविणार्‍या घटनांना चालना देऊ शकतो. नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास योग संभवतात. त्यातूनही लाभाचीच फळे आपणांस चाखावयास मिळू शकतात. तथापि नव्या कोणत्याही उपक्रमाची सुरुवात सध्या करू नका. बुधासोबतचा मंगळ एखादा दगाफटका घडवू शकतो. त्यामुळे तेवढी सावधगिरी बाळगावयास हवी. काहींना किरकोळ दुखापती वा प्रकृतीसंबंधी त्रास निर्माण होऊ शकतात. वाहने सांभाळून चालावायास हवीत. पथ्य-पाणी, औषधोपचार सांभाळावा. शुभ दिनांक- १०,११,१४,१५.

कर्क-  प्रवासाच्या संधी येतील 
हा आठवडा आपणांस आर्थिक दृष्ट्या समाधानकारक जावा. विशेषतः फिरत्या वा मोसमी व्यवसायात असणार्‍यांना तर हा काळ उत्साहवर्धक ठरू शकतो. उत्तम प्रवास योग संभवतो. विदेशात शिक्षण, व्यवसाय वा नोकरीच्या निमित्ताने जाऊ इच्छिणार्‍यांना चांगल्या संधी लाभू शकतात. युवावर्गाला नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर पडावे लागू शकते. विवाहेच्छूंना जोडीदार लाभण्यासाठी वेगवान हालचाली घडाव्यात. या राशीच्या कलावंतांना देखील हा आठवडा चांगला जावा. चांगले यश, सन्मान लाभेल. चोरी, वस्तू हरवणे वा छोटी-मोठी दुखापत याबाबतीत मात्र काळजी घ्यावी.  शुभ दिनांक- १०,११,१२,१४.

सिंह-  आर्थिक बलवत्ता लाभेल
या आठवड्याची सुरुवातच आपणांस आर्थिक बलवत्ता प्रदान करणार्‍या घटनांनी होण्याची शक्यता आहे. विशेषतः व्यावसायिकांना हा अनुभव निश्‍चितपणे लाभू शकतो. सरकारी पाठिंबा वा विदेशी सहकार्याने व्यवसाय करणार्‍यांना उत्तम यशाची अपेक्षा बाळगता येईल. आठवड्याच्या मध्यानंतर तर यात अधिकच भर पडू शकते. एकीकडे असे व्यावसायिक यश मिळत असतांना दुसरीकडे घरात, कुटुंबात असमाधान व संघर्षाचे वातावरण राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाऊबंदकी, वारशाचे प्रश्‍न, ज्येष्ठ मंडळींच्या प्रकृतीविषयक समस्या या सार्‍यांनी आपण मेटाकुटीस येऊ शकता. शुभ दिनांक- १०.११,१४,१५.

कन्या-  उत्तरार्धात दिलासा मिळणार
हा आठवडा आपणांस प्रकृतीविषयक काही तक्रारी, बराच खर्च व अनपेक्षित प्रवासयोग देणारा असणार आहे. यामुळे प्रचंड, दगदग, धावपळ, मनस्ताप असे अनुभव येऊ शकतात. प्रकृतीची काळजी घ्यायला हवी. आठवड्याच्या सुरुवातीस याबाबतीत जरा सतर्कच रहावयास हवे. मात्र आठवड्याच्या उत्तरार्धात या सार्‍या परिस्थितीतून आपणास काहीसा दिलासा मिळू शकतो. युवावर्गाला नोकरी, व्यवसायाच्या अनुषंगाने  चांगले योग यावेत. विवाहेच्छूंना मंडळींचा जोडीदारासाठीचा शोध या काळात संपुष्टात येऊ शकेल. वाहने सांभाळून चालवा. वीज व आगीची उपकरणे काळजीपूर्वक वापरावीत. शुभ दिनांक- १३,१४,१५,१६.

तुला-  जोखमीचे व्यवहार टाळा
हा आठवडा आपणांस जोखमीचे व्यवहार टाळावयास सुचवीत आहे. विशेषतः शेअरबाजार, आर्थिक गुंतवणूक करताना पुरेशी खातरजमा करून घेतली पाहिजे. फसवणुकीचे काही योग निर्माण होताना दिसतात. उसनवरीने पैसे देणे, कर्जाचे व्यवहार काही काळ लांबणीवर टाकायला हवेत. सरकारी कामें किंवा राजकीय व्यक्तींकडून करावयाच्या कामात सफलता मिळू शकेल. नोकरी, व्यवसायाच्या शोधात असणार्‍या युवकांना काही चांगल्या संधी मिळू शकतील. त्यानिमित्ताने काहीसा प्रवास देखील घडू शकतो. या सार्‍यात मनाचे संतुलन मात्र सांभाळावयास हवे. मतभेद टाळा. शुभ दिनांक- १०,११,१५,१६.

वृश्‍चिक-  सामाजिक चौकट सांभाळा
या आठवड्यात सर्वसामान्य स्वरूपाच्या आणि समाधानकारक घटनांची नोंद करता येऊ शकेल. शनि-मंगळाच्या कुयोगामुळे काही मानसिक चिंता, ताणतणावाचे प्रसंग मात्र आपला पिच्छा पुरविणार आहेत, असे दिसते. सामाजिक चौकट मोडण्याचा प्रयत्न कदापिही करू नका. त्यातून काही विपरीत घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कठीण प्रसंगात थोरा-मोठ्यांचा सल्ला व आधारच कामी येईल. कुटुंबात असमाधान व संघर्षाचे वातावरण राहील. नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या शोधात असणार्‍यांना काही काळ वाट पहावी लागू शकते. त्यामुळे जरा धीर धरा, प्रयत्न सोडू नका. शुभ दिनांक- ११,१२,१५,१६.

धनु-   कार्याचा ठसा उमटवाल
या आठवड्यात आपल्याला प्रत्येक कार्यावर यशस्वितेची मोहोर उमटविता येऊ शकेल. चौफेर यश आणि मनासारख्या घटना घडताना दिसतील. त्यामुळे विविध क्षेत्रात आपली कार्यक्षमता जोखून पाहण्यासाठी सध्याचा एकूणच काळ लाभदायक ठरावा. तथापि, जुगार, लॉटरी, बेकायदेशीर व्यवहारापासून मात्र दूरच राहायला हवे. कायद्याचा बडगा गोत्यात आणू शकेल. व्ययातला शनि- दशमातला मंगळ मानहानी, द्रव्यहानी दर्शवीत आहेत. त्यामुळे सावधगिरी हाच एकवेव उत्तम मार्ग ठरावा. स्थावर मालमत्ता खरेदी, मोठे वाहन खरेदी करण्याची योजना फलद्रूप होऊ शकते. विवाहादी शुभकार्ये जुळून यावीत. शुभ दिनांक- १०,११,१४,१५.

मकर-  प्रगतिकारक घटना संभवतात
या आठवड्याची सुरुवात आपणांस काहीशी त्रासदायक व मानसिक चिंता निर्माण करणारी ठरू शकते. दगदग, धावपळ, प्रवासात त्रास, वाढीव खर्च असे अनुभव आपणांस सुरुवातीस येऊ शकतात. त्यानंतर मात्र आपणांस उत्कर्ष व प्रगतीकारक घटनांनी युक्त असा हा आठवडा लाभू शकतो. गुरू-शुक्र योग तरुण वर्गाला अतिशय उत्तम जावा. नोकरी-व्यवसायाचा शोध संपावा. विवाहेच्छूंचे विवाह जमणे, संतानप्राप्तीचे योग या बाबतीतही या काळात चांगला व उपयुक्त घटनाक्रम अनुभवता येईल. मान-सन्मान, विदेश गमनाचे योग, विदेशाशी संबंधित व्यवसायात यश मिळावे. शुभ दिनांक- १३,१४,१५,१६.

कुंभ-  सहकार्‍यांशी तणावाचे प्रसंग 
या आठवड्यातील संमिश्र ग्रहमानामुळे एकूणच चढ-उताराचे प्रसंग अनुभवास येण्याची शक्यता आहे. नोकरी-व्यवसायात प्रचंड स्पर्धा, विरोधकांच्या छुप्या कारवाया मनाचा त्रागा वाढवतील. अधिकारी तसेच सहकार्‍यांशी तणावाचे, मतभेदाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. त्यामुळे जरा सावधच असायला पाहिजे. कारण या अल्पकालीन घटनांचे पडसाद मात्र दीर्घकाळ उमटत राहू शकतात. कुटुंबात देखील तणावाचे व मतभेदाचे वातावरण राहील. मुलांचे तसेच महिला वर्गाचे आरोग्यासंबंधीचे प्रश्‍न निर्माण होतील. प्रवास व अचानक खर्चामुळे देखील वैताग वाढू शकतो. मनाचा तोल ढळू देऊ नका. शुभ दिनांक- १०,११,१५,१६.

मीन- व्यावसायिक गतिमानता लाभेल
या आठवड्यातील ग्रहयोग आपणांस व्यावसायिक गतिमानता बहाल करणारे दिसत आहेत. व्यवसायात बदल, व्यवसायाचा विस्तार करणे, नोकरीत महत्त्वाचे काम सोपविले जाणे, युवा वर्गाला नोकरी-व्यवसायासाठी उत्तम संधी लाभणे असे योग या आठवड्यात येऊ शकतात. या अनुषंगाने काहींना घरापासून दूर जाण्याचे, लांबच्या प्रवासाचे योग देखील संभवतात. व्यवसायात काही मोठ्या उलाढाली घडून चांगला लाभ मिळू शकेल. सरकारी कारवाई, प्रलंबित प्रकरणे यातून मार्ग निघू शकेल. अनुभवी लोकांचे मार्गदर्शन फायद्याचे ठरेल. काहींना जोडीदाराचा उत्कर्ष अनुभवता येईल. शुभ दिनांक- १०,१३,१४,१६.
– मिलिंद माधव ठेंगडी (ज्योतिषशास्त्री)/ ८६००१०५७४६