मेक्सिको भूकंपातील बळीसंख्या ६०

0
199

मेक्सिको, ९ सप्टेंबर 
मेक्सिकोच्या दक्षिण समुद्र किनारपट्टीच्या भागात गुरुवारी मध्यरात्रीनंतर बसलेल्या अतिशय शक्तिशाली भूकंपात आतापर्यंत ६० लोकांचा बळी गेला असून, अनेक जखमी झाले आहेत. तर, शेकडो इमारती जमीनदोस्त झाल्या.
८.१ इतक्या तीव्रतेच्या या भूकंपाचा धक्का बसल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास गाढ झोपेत असलेले लोक घराबाहेर सैरावैरा धावत सुटले आणि सुरक्षित ठिकाण गाठले होते. धक्क्याची तीव्रता इतकी जास्त होती की, क्षणातच अनेक घरांचा ढिगारा झाला. (वृत्तसंस्था)