वीजनिर्मितीत महाराष्ट्राचा देशात सहावा क्रमांक

0
79

मुंबई, ९ सप्टेंबर 
राज्यात दिवसेंदिवस वीजनिर्मितीत वाढ होत आहे. २०१४-१५ मध्ये राज्यात देशातील सर्वाधिक वीजनिर्मिती झाली; परंतु दरडोई वीजनिर्मितीत राज्याचा क्रमांक सहावा आहे. वीजनिर्मितीत हिमाचलप्रदेश सध्या आघाडीवर आहे. त्या खालोखाल गुजरात, छत्तीसगड, पंजाब आणि हरियाणाचा क्रमांक लागतो.
महाराष्ट्रात २०१५-१६ मध्ये एकूण वीजनिर्मितीत पूर्वीच्या वर्षांपेक्षा ९.६ टक्के इतकी वाढ झाली असून, १ लाख १३ हजार ७८७ दशलक्ष युनिट्‌स वीजनिर्मिती झाली. २०१६-१७ मध्ये डिसेंबरपर्यंत राज्यात ८२ हजार ४४१ दशलक्ष युनिट्‌स वीजनिर्मिती झाली. एकूण वीजनिर्मितीत महानिर्मितीचा वाटा ४१.९ टक्के असून, त्याखालोखाल अदानी पॉवर कंपनीचा वाटा १७.६ टक्के, नवीकरणीय ऊर्जा ७.६ टक्के, जेएसडब्ल्यू एनर्जी ७.४ टक्के, टाटा पॉवर ७.१ टक्के, रतन इंडिया पॉवर ५.४ टक्के, व्हीआयपी बुटीबोरी व एम्को पॉवर प्रत्येकी ३.५ टक्के आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर ३.१ टक्के व इतर २.९ टक्के असा होता.
केंद्रीय क्षेत्राकडून राज्याला २०१५-१६ मध्ये २९ हजार १७९ दशलक्ष युनिट्‌सआणि २०१६-१७ मध्ये डिसेंबर २०१६ पर्यंत २२ हजार ४३६ दशलक्ष युनिट्‌स वीज मिळाली.
काही दिवसांपासून राज्याने वीजनिर्मितीकडे विशेष लक्ष दिले असून, वीजनिर्मिती करणार्‍या कंपन्यांना लागणार्‍या परवानग्या एक खिडकी योजनेअंतर्गत आणल्यामुळे हा परिणाम दिसत आहे, असे ऊर्जा विभागातील अधिकार्‍याने सांगितले.
वीजनिर्मितीची वाढ (दशलक्ष युनिट्स)
स्रोत २०१३-१४ २०१४-१५ २०१५-१६ २०१६-१७
राज्यामधील ९१,९८७ १,०३,७७९ १,१३,७८७ ८२,४४१
औष्णिक ७१,६८६ ८४,८८२ ९४,४८२ ६३,९७२
नैसर्गिक वायुजन्य ६,०५५ ४,६२६ ५,३०२ ७,१२२
जलजन्य ६,७६३ ५,८५६ ५,०४५ ४,१९६
नवीकरणीय ७,४८३ ८,४१५ ८,९५८ ७,१५१
केंद्रीय क्षेत्रातून उपलब्ध ३१,५२५ ३०,४०१ २९,१७९ २२,४३६(वृत्तसंस्था)