सोन्याच्या दरात वर्षातील सर्वात उच्चांकी वाढ

0
85

मुंबई, ९ सप्टेंबर 
सोन्याच्या दरात या वर्षातील सर्वात मोठी वाढ झाली असून ते  ३१ हजार ३५० रुपयांवर सोने पोहोचले आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे १० महिन्यातील ही सर्वात उच्चांकी वाढ आहे. सोन्याचे दर नोव्हेंबर २०१६मध्ये ३१ हजार २०० रुपयांवर पोहोचले होते.
उत्तर कोरियाची बॉम्ब चाचणी हे कारण सोन्याच्या दरवाढीमागे आहेच. पण यामागे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे, ते म्हणजे भारत आणि दक्षिण कोरियामध्ये झालेला करार.
भारताने या करारानुसार कोरियातून सोन्याची नाणी आयात केली तर त्यावर इम्पोर्ट ड्युटी लागत नाही. दहा टन नाणी मागील दोन महिन्यात आयात झाली आहेत. शिवाय त्यावर जीएसटीही लागत नसल्यामुळे सोन्याचा दर कमी होता. हे सोने व्यापार्‍यांनी बाजारात आणून ते वितळवले.
पण अपेक्षित महसूल सरकारला मिळाला नाही. तसेच ही आयात दीड महिन्यानंतर बंद झाल्याने सोन्याचे दर वधारले आहेत. (वृत्तसंस्था)