१४ बाबा भोंदू!

0
69

– आखाडा परिषदेकडून यादी जाहीर
अलाहाबाद, १० सप्टेंबर 
अखिल भारतीय आखाडा परिषदेने देशभरातील १४ भोंदू बाबांची यादी आज रविवारी जाहीर केली आहे.
अलाहाबादेत आयोजित बैठकीनंतर आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी महाराज यांनी अशा बाबांची यादी जारी केली, ज्यांच्याकडून धर्माच्या नावाखाली लोकांची दिशाभूल केली जाते. राधे मॉं, आसाराम बापू आणि राम रहीम यासारख्या भोंदू बाबांची यामध्ये नावे आहेत. ही यादी सरकारला सोपवली जाणार आहे. जेणे करून लोकांच्या भावनेशी खेळणार्‍या या भोंदू बाबांवर कारवाई केली जाईल. डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहीमच्या अटक आणि शिक्षेनंतर देशातील भोंदूबाबाची ही यादी आता समोर आली आहे.
दरम्यान, आखाडा परिषदेने संत ही उपाधी देण्याबाबत एक ठराविक प्रक्रिया निश्‍चित करण्याचा निर्णय घेतला आहे. आता संबंधित व्यक्तीची पडताळणी आणि त्याचे आकलन केल्यानंतरच संत ही उपाधी बहाल केली जाणार आहे. या बैठकीपूर्वी नरेंद्र गिरी महाराज यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. बैठकीपूर्वी एक दिवस फोनवरून ही धमकी देण्यात आली. या प्रकरणी त्यांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. धमकी देणारा व्यक्ती आपण आसाराम बापूचा शिष्य असल्याचे सांगत आहे.
१) आसाराम बापू ऊर्फ
आशुमल शिरमलानी
२) सुखविंदर कौर ऊर्फ राधे मॉं
३) नारायण साई
४) गुरमीत राम रहीम सिंह
५) स्वामी असीमानंद
६) ओम नमः शिवाय बाबा
७) सच्चिदानंद गिरी ऊर्फ सचिन दत्ता
८) ओमबाबा ऊर्फ विवेकानंद झा
९) निर्मल बाबा उर्फ निर्मलजित सिंह
१०) इच्छाधारी भीमानंद ऊर्फ
शिवमूर्ती द्विवेदी
११) रामपाल
१२) आचार्य कुशमुनी
१३) बृृहस्पती गिरी
१४) मलखान सिंह(वृत्तसंस्था)