बांगलादेशात तीन लाख रोहिंग्यांना आश्रय ः युनो

0
195

-• जाळपोळ, हिंसाचाराचा सामना करावा लागतो
संयुक्त राष्ट्रे, १० सप्टेंबर 
म्यानमारमध्ये रखिने प्रांतात हिंसाचारानंतर तीन लाख रोहिंग्या मुस्लिमांनी मागील दोन आठवड्यांत बांगलादेशात आश्रय घेतला आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांच्या शरणार्थी संस्थेचे प्रवक्तेजोसेफ त्रिपुरा यांनी दिली.
बांगलादेशात अनेक रोहिंग्या शरणार्थी पायी किंवा बोटीने येत असून, म्यानमारसोबत असलेली तब्बल २७८ किमी लांबीची सीमा ओलांडून ते आले आहेत. सीमेवरील नाफ नावाची नदी ओलांडून एकूण तीनशे बोटी दाखल झाल्या आहेत. संयुक्त राष्ट्रांनी गुरुवारी शरणार्थीची संख्या १ लाख ६४ हजार असल्याचे जाहीर केले होते.
रोहिंग्या मुस्लिमांना म्यानमार मधील बौद्ध बहुसंख्यकांकडून वाईट वागणूक दिली जाते. म्यानमार सरकार त्यांना बांगलादेशातून आलेले बेकायदेशीर स्थलांतरित समजत आहेत. मात्र, अनेक शतकांपासून रोहिंग्या तेथे सीमेवरील छावण्यांतून निर्वासित आहेत. म्यानमारमध्ये या मुस्लिमांना जाळपोळ, हिंसाचाराचा सामना करावा लागला आहे, असेही युनोकडून स्पष्ट करण्यात आले. (वृत्तसंस्था)