योगी, मोदींचे चित्र काढल्याने नववधूला पतीकडून मारहाण

0
15

लखनौ, ११ सप्टेंबर  
उत्तरप्रदेशातील बलियामध्ये एका मुस्लिम महिलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे चित्र काढणे फारच महागात पडले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकत्याच लग्न झालेल्या विवाहितेने आपली आवड जोपासत पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री आदित्यनाथ यांची चित्रे काढली. पण तिने काढलेल्या या चित्रामुळे तिचा पती भलताच भडकला आणि त्याने थेट तिला मारहाण केली. मोदी आणि योगींचे चित्र काढल्याने या महिलेचा पती आणि इतर पाच जणांनी तिला बेदम मारहाण केली. त्यामुळे महिलेने सरळ पोलिसात धाव घेत पती आणि त्याच्या पाच नातेवाईकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पीडित महिलेच्या वडिलांच्या मते, आपली आवड जोपासण्याची तिला मोठी किंमत मोजावी लागली आहे. यामुळे तिला मारहाण तर झालीच. पण, सासरकडच्यांनी तिला घराबाहेरही काढले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी पीडित महिलेच्या पतीसह सहाजणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. सध्या पोलिस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत. (वृत्तसंस्था)