उत्तर कोरियाचा हायड्रोजन बॉम्ब २५० किलोटनाचा

0
181

अमेरिकन निरीक्षकांचे मत
सेऊल, १३ सप्टेंबर
उत्तर कोरियाने अलीकडेच यशस्वी चाचणी केलेला हायड्रोजन बॉम्ब सुमारे २५० किलोटन वजनाचा असल्याचे मत अमेरिकन निरीक्षकांनी व्यक्त केले आहे.
उत्तर कोरियाने काही दिवसांपूर्वीच आपली सहावी आणि आजवरची सर्वात मोठी अणुबॉम्बची चाचणी घेतली होती. हा हायड्रोजन बॉम्ब असल्याचे स्पष्ट झाले होते. या चाचणीमुळे ६.३ इतक्या तीव्रतेचा भूकंप झाला होता. इतकेच नव्हे, तर हा दूरवर वाहून नेणार्‍या आंतरखंडीय क्षेपणास्त्राचीही या देशाने चाचणी केली होती.
या हायड्रोजन बॉम्बच्या चाचणीमुळे झालेल्या भूकंपाची तीव्रता आणि अन्य बाबींचे परीक्षण केल्यानंतर या बॉम्बचे वजन २५० किलोटन इतके असल्याचा निष्कर्ष निरीक्षकांनी काढला आहे.
१९४५ मध्ये अमेरिकेच्या ज्या अणुबॉम्बने हिरोशिमा पूर्णपणे उद्‌ध्वस्त केले होते, त्याचे वजन केवळ १५ किलोटन इतके होते. अर्थात, उत्तर कोरियाचा हा अत्याधुनिक हायड्रोजन बॉम्ब वजन आणि आकाराच्या तुलनेत अमेरिकेच्या या बाम्बपेक्षा १६ पट जास्त मोठा आहे. (वृत्तसंस्था)