नारायण महावादीवार यांचे निधन

0
182

तभा वृत्तसेवा
मूल, १७ ऑक्टोबर
मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष, ब्राह्मण महासभेचे शाखाध्यक्ष तथा सेवानिवृत्त शिक्षक नारायण महावादीवार यांचे अल्पशा आजाराने सोमवारी पहाटे निधन झाले. मृत्यूसमयी ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, स्नुषा, नातवंड यांच्यासह बराच मोठा परिवार आहे.
सावली येथील विश्‍व शांती विद्यालयात अध्यापनाचे कार्य करताना त्यांनी सावली तालुका पत्रकार संघाची स्थापना केली. नागपूर पत्रिका आणि दैनिक तरुण भारतचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी कित्येक वर्ष कार्य केले. उत्कृष्ट ज्योतिष्यकार, अनुभवी पुरोहित आणि मंगलाष्टककार म्हणून ते परिचित होते. त्यांनी नाटक आणि पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाला अनेक घटकांना न्याय दिला. अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते १५ दिवसांपूर्वीच सावली तालुका पत्रकार संघाने त्यांचा सत्कार केला होता.
त्यांच्या पार्थिवावर उमा नदीच्या तिरावर अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावलीचे सचिव राजाबाळ संगीडवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शोकसभेत संजय मारकवार, उदय गडकरी, गंगाधर डोहणे, बंडू डोहणे, विजय आडेपवार, मनोहर गेडाम, प्रवीण मोहुर्ले, शशिकांत धर्माधिकारी आदी उपस्थित होते.