नवीन नोंदणीकृत वाहनांच्या करात वाढ

0
141

तभा वृत्तसेवा
गोंदिया, २० ऑक्टोबर
राज्य शासनाच्या गृह विभागाच्या १ सप्टेंबर २०१६ च्या निर्णयानुसार नवीन नोंदणी होणार्‍या वाहनावरील करात २४ ऑक्टोबर २०१६ पासून वाढ करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या रस्ता सुरक्षा समितीने दिलेल्या आदेशानुसार, रस्ता सुरक्षा निधीची स्थापना करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. खाजगी संवर्गातील दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहने यावर एक रकमी देय कराच्या २ टक्के उपकर लागू होणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गोंदिया यांनी येथे दिली.