डॉ. विजय आईंचवार यांना मातृशोक

0
149

तभा वृत्तसेवा
चंद्रपूर, २३ ऑक्टोबर
श्रीकन्यका नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विजय आईंचवार यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई आईंचवार यांचे २३ ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्या ८९ वर्षांच्या होत्या. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे नेत्रदान करण्यात आले.
आठ दिवसांपूर्वीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यामुळे आईंचवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्‍चात दोन मुले व तीन मुली, सुना, नातवंड असा आप्तपरिवार आहे. सोमवार, २४ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता विद्यानगर, गजानन महाराज मंदिर येथून अन्त्ययात्रा निघणार आहे.