यशवंत कुळकर्णी यांचे निधन

0
135

तभा वृत्तसेवा
जानेफळ, ३ नोव्हेंबर
येथील प्रतिष्ठीत नागरिक दिनकरराव यशवंतराव कुळकर्णी यांचे वृद्धापकाळाने २ नोव्हेंबरच्या मध्यरात्री निधन झाले. मृत्यूसमयी ते ९० वर्षांचे होते.
नागपूरच्या सी.पी.ऍण्ड बेरार महाविद्यालयातील प्रा. डॉ. अजय कुळकर्णी यांचे ते वडील आहेत. बुलढाणा जिल्ह्यात दिनुकाका म्हणून ते परिचित होते. स्थापत्यशास्त्रामध्ये त्यांनी लौकिक मिळविला होता.
त्यांच्या पश्‍चात संजय, अजय हे पुत्र, मीरा, विभा, वीणा ह्या कन्या, नातवंडे व बराच मोठा आप्त परिवार आहे.